किनगावातील तरुणाचा तिघा तरुणांवर चाकूहल्ला


यावल : तालुक्यातील किनगाव येथे तिघा तरुणांवर किरकोळ वादातून एकाने चाकूहल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हल्ल्यानंतर संशयीत पसार झाला आहे.

मोठी बातमी : प्रतीक्षा संपली ; उद्या लागणार दहावीचा निकाल 

तिघे तरुण हल्ल्यात जखमी
यावल तालुक्यातील किनगाव येथे बुधवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास शाह नामक तरुणाने तौसीफ समीर तडवी (19), शरीफ लुकमान तडवी (19) व सद्दाम नवाज तडवी (20) या तीन युवकांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात हे तिन्ही तरूण गंभीर जखमी झाले. तिघांना यावल ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री उशिरा यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर पसार झाला आहे. चाकू हल्ला का करण्यात आला याचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.

बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणार्‍या तरुणाची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या 


कॉपी करू नका.