भुसावळातील प्रसिद्ध भुलतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांचे निधन


भुसावळ : शहरातील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन रामचंद्र पाटील (36, रा.मोहित नगर, भुसावळ) यांचे गुरुवारी सकाळी अज्ञात कारणाने निधन झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगावातील तरुणाचा तिघा तरुणांवर चाकूहल्ला 

डॉक्टरांच्या मृत्यूने शहरात खळबळ
भुसावळातील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ.नितीन पाटील हे दररोज सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्णालयात येत असत मात्र गुरुवारी साडेनऊ वाजेनंतरही ते रुग्णालयात न आल्याने तसेच फोन उचलत नसल्याने कर्मचार्‍यांनी डॉक्टरांचे मोहित नगरातील घर गाठले असता डॉक्टर मृतावस्थेत आढळले. मयत डॉ.नितीन पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ असा परीवार आहे.

साक्री तालुक्यात ऑनरकिलींग : भावानेच केली बहिणीची हत्या 

 


कॉपी करू नका.