पूरग्रस्तांना रोखीने मिळणार पाच हजारांची मदत
पूरग्रस्तांची बायोमेट्रिक मशीनद्वारे ओळख पटविली जाणार
पुणे : सरकारकडून ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना 10 हजार तर शहरी भागातील पूरग्रस्तांना 15 हजारांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी पाच हजार रुपये मंगळवारपासून रोख व इतर मदत बँकेत जमा केली जाणार आहे. बँकांनी पैसे देताना पूरग्रस्तांकडे पासबुक वा चेकबुक मागू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पूरग्रस्त भागातील 469 एटीएम केंद्रांपैकी 218 केंद्र बंद आहेत. पूरग्रस्तांची बायोमेट्रिक मशीनद्वारे ओळख पटविली जाईल. ओळख न पटल्यास अन्य खातेदारांमार्फत ही ओळख पटविली जाईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.