निवडणूक कामात ग्रामविकास अधिकार्‍याचा मृत्यू : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भरपाईची मागणी


भुसावळ- रोझोदा येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश राजाराम मुंडके हे रोझोदा गावासाठी बीएलओ म्हणून नियुक्त होते. निवडणूक कामादरम्यान त्यांचा 7 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. निवडणुकीसाठी तैनात असलेल्या मुंडके यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाने त्यांच्या कुटुंबियांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी रावेर तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे रावेर तहसीलदारांना करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष दीपक कोसोदे, उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, सचिव उदय चौधरी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


कॉपी करू नका.