बोदवड शहर व तालुक्यात 14 रोजी सलून दुकाने बंद


बोदवड : शहरासह तालुक्यातील सलून दुकाने 14 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचा निर्णय बोदवड तालुका नाभिक समाजबांधवांच्या बैठकीत घेण्यात आला असून या सभेत सुकाणू समितीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला. या समितीने नाभिक समाजाला शैक्षणिक, सामाजिक आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नाभिक समाजबांधवांवर होणारा अन्याय ,हल्ला यासाठी दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली असून त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सलून व्यावसायीकांनी आपली सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
शांततेने होणार्‍या नाभिक सलून बंदला समाजाच्या सर्व लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन बोदवड तालुका समाजाध्यक्ष विवेक वखरे, उपाध्यक्ष गोपाल बोरसे, राजेंद्र शेळके, सचिव गणेश सोनोने, संतोष कुंवर, संजय वाघ, राजू डापसे, श्रीनिवास बाभूळकर, अनिल कळमकर, हरीभाऊ सुरांशे, अमोल आमोदकर, राजेंद्र बाभूळकर, योगेश वखरे, शरद बोरणारे, गोपाळ वखरे, धनराज शेळके, आकाश सोनवणे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.


कॉपी करू नका.