पूरग्रस्तांना निधी देवून चाळीसगावातील डॉ.एपीजी अब्दुल कलाम फाऊंडेशनने केली ईद साजरी


चाळीसगाव : समाजाचे देणं लागतो या भावनेने शहरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनने पश्‍चिम महाराष्ट्रावर आलेले पुराचे संकट पाहून पूरग्रस्तांसाठी लागणार्‍या वस्तू जमा करीत त्या कोल्हापूरसह सांगलीतील पूरग्रस्तांना पाठवत बकरी ईद साजरी केली. फाऊंडेशनच्या पदाधिर्‍यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या दुखाःत सहभागी होण्यासाठी सोशल मिडियावर मदतीसाठी आवाहन केल्याने त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी ईदगाह मैदानावर वस्तु व रोख रक्कम जमा करण्यात आल्या.

चाळीसगावकर ठरले दातृत्ववान
चाळीसगावकरांनी मदतीचा हात देत पुन्हा एकदा दातृत्वाचा परीचय दिला.
त्यात हाजी गफुर पहेलवान (50 किलो तांदूळ), अजीज खाटीक (पेस्ट, तेल, बिस्किट बॉक्स), अय्युबभाई बिर्याणी (सोया तेल), डॉ.जावेद शेख (औषधी व मेडिकल किट), विनोद अग्रवाल(सोया तेल, निरमा साबण बॉक्स, गहु कट्टा, पारले बिस्किट), अ‍ॅड.समीर शेख (पारले100 पक), वसीम बागवान (50 किलो साखर), दिलीप जाने (पोहे), बालाप्रसाद राणा (साबण, चहा, फिनाईल), जितेंद्र वरखेडे (30 किलो गहु), जावेद बागवान (फ्रुटस् व चटाई), चैताली स्वीट्स (टुथ ब्रश), खलिल पिंजारी (10 पक पोहे),मनोज अग्रवाल (10 शर्टस व कपडे) अशी मदत दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, डी.वाय.एस.पी.उत्तमराव कडलग, पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, आर.डी.चौधरी, अनिल निकम, रमेश शिंपी, हाजी गफुर पहेलवान, असलम मिर्झा, अजीज मन्सुरी, रफिक मनियार, अनिस मिर्झा, राजु शेख, छोटु पहेलवान, खलील शेख उपस्थित होते. मदत जमा करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिज खाटीक, सचिव सरदार शेख व पदाधिकांर्‍यानी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.