अट्टल दुचाकी चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात : चोरीच्या 29 दुचाकी जप्त


Attal two-wheeler thieves in the net of crime branch : 29 stolen two-wheelers seized सोलापूर : चोरीच्या 29 दुचाकींसह तिघा चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मच्छिंद्र भागवत जाडकर ( वय 36, रा. सिंदवाडा, मोडनिंब), सचिन जालिंदर चव्हाण ( वय 36, महावीर पथ, मोडनिंब, माढा), दत्तात्रय रावसाहेब शेळके ( वय 25, रा. अरण, माढा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

27 गाडी मालकांचा लागला शोध
यातील 27 गाडी मालकांचा शोध लागला असून दोन गाडी मालकांचा शोध अद्याप सुरू आहे. एकूण आठ लाख 45 हजार रुपये किमतीचे या मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सपोनि दादासो मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !