बिबट्याच्या कातडीची तस्करी उधळली : तस्करांच्या हल्ल्यानंतर वनकर्मचार्‍यांचा गोळीबार : चौघे अखेर जाळ्यात


Leopard skin smuggling busted: Forest personnel fired after smugglers attack: Four finally caught
नाशिक :
वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या कातडीची तस्करी होण्यापूर्वीच चौघांच्या टोळीला जेरबंद केले मात्र आरोपींनी पथकावर हल्ला चढवल्यानंतर पथकाने हवेत गोळीबार केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जव्हार-मोखाडा रस्त्यावरील आंबोली फाट्यावर सोमवारी दुपारी चार वाजता ही कारवाइृ झाली. आरोपींच्या ताब्यातून बिबट्याची संपूर्ण कातडीदेखील जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मोखाड्याच्या काही संशयीतांनी बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी शिकार केल्याची गोपनीय माहिती इगतपुरी वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. कातडीच्या खरेदीसाठी हिंदीभाषिक ग्राहक असल्याचे भासवून बिरारीस यांनी तस्करांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला तस्करांनी घोटीमध्ये येण्यास सांगितले. तेथून पुन्हा पत्ता बदलून थेट त्र्यंबकेश्वरजवळ बोलविले.

झटापटीत वन कर्मचारी जखमी
आंबोली फाट्यावर एका शेतात खरेदीचा बनाव बिरारीस व त्यांच्या पथकाने सुरू केला. कातडी ताब्यात घेत रक्कम देत असताना अचानकपणे तस्करांनी दगडांनी पथकावर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या झटापट व मारहाणीत दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही झटापट रोखून संशयितांना वाहनांत डांबण्यासाठी बिरारीस यांनी स्वत:जवळील पिस्तुलने हवेत दोन फैरी झाडल्या. यानंतर चौघांना ताब्यात घेण्यास पथकाला यश आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !