‘Mahilaraj’ on Malod GramPanchayat with Parsade परसाडेसह मालोद ग्रामपंचायतीवर ‘महिलाराज’


‘Mahilaraj’ on Malod Gram Panchayat with Parsade यावल : तालुक्यातील परसाडे बुद्रुक व मालोद या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य पदाकरीता सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. मालोद ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच पदावर आठ उमेदवार रींगणात होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिक रमाबाई भारसिंग बारेला यांनी 712 मते मिळवत सरपंच पदावर बाजी मारली. रमाबाई बारेला या माजी उपसभापती भारसिंग बारेला यांच्या पत्नी आहेत.

परसाडे सरपंचपदी नजमा तडवी
परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीतदेखील सरळ दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. यात माजी सरपंच नजमा मजीत तडवी यांचा पंचायत समितीच्या माजी सदस्य मीना राजू तडवी यांनी अवघ्या 12 मतांनी पराभव करीत विजय मिळवला. मीना तडवी यांना 534 मते मिळवून विजयी झाल्या. तहसील कार्यालयात निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्ते तथा शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. सदस्य पदावर परसाडे बुद्रुक मध्ये बाबासाहेब शंकर भालेराव (174), रमजान छबू तडवी (163), खल्लाबाई इनुस तडवी (162), सुलेमान कान्हा तडवी (196), मुन्नाबाई इस्माईल तडवी (212), योगीता सतीश सावळे (195), रोशन सुभान तडवी (212), सकिला महमूद तडवी (145), मदिना सुभेदार तडवी (228) या विजयी झाल्या. मालोद ग्रामपंचायतीत दशरथ रमजान तडवी (183), परवीन भिकारी तडवी (331), नजमा हमीद तडवी (बिनविरोध), पियया रूलसिंग बारेला (मते 177), सुंदरसिंग गुलाब बारेला (445), उर्मिला अनिल बारेला (424), सैनाज शरीफ तडवी (255), सलीम अकबर तडवी (99), आबेदा सिकंदर तडवी (159), शकीला रणजीत बारेला (145), जहांगीर शेरखा तडवी (483), भिका निजाम तडवी (385), मुन्नी जुम्मा तडवी (359) या विजयी झाल्या.


कॉपी करू नका.