जळगावात नाकाबंदीत 20 लाखांची रोकड जप्त
जळगाव (16 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहरात पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये 20 लाख रुपयांची रोकड आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही पोलिसांनी जप्त केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांच्या कडून ही नाकाबंदी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटींची रक्कम सापडली
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आले आहेत. तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांनी जप्त केला आहे. जळगाव जिह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या रक्कमेमुळे खळबळ उडाली आहे.
