पाचोरा तालुक्यात पत्नीचा गळा आवळून खून : आरोपी पतीला अटक
पाचोरा (16 नोव्हेंबर 2024) : चारीत्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा रूमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता गोराडखेडा येथे घडली. भाय्या उर्फ भैय्या शंकर चव्हाण (58, रा.गोराडखेड, ता.पाचोरा, मु.रा.कुसम्या, ता.निवाली, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
मध्यप्रदेशातील कुसम्या येथील रहिवाशी असलेल्या सैय्यादीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण (52) ही महिला आपले पती भाया उर्फ भैय्या चव्हाण यांच्या सोबत पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे वास्तव्याला होत्या. दरम्यान तिचे पती भाया उर्फ भैय्या चव्हाण हा तिच्यावर नेहमी चारीत्र्याचा संशय होता. त्यावरून त्यांचे नेहमी भांडण होत होते. शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता पत्नी झोपलेली असतांना त्याने पत्नीच्या गळ्यात रूमाल आवळून तिचा खून केला. ही घटना उघडकीला आल्यानंतर पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.

त्यानंतर शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील (32, रा.गोराडखेडा, ता.पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.
