यावलमध्ये गोवंश हत्या : दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल


यावल : बकरी ईदच्या दिवशी हडकाई नदी काठावर कुडाचा आडोसा घेत संशयीत आरोपी शेख मोहसीन शेख खालीद (रा.बाबानगर) आणि अय्याज मेहमूद बागवान यांनी गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही गुरांची हत्या केल्याचा प्रकार सोशल मिडीयावर झालेल्या व्हायरल क्लीपने उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दखल घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी गुरांची हत्या करून त्यांची तोंडे व टाकाऊ अवयव त्याच जागेवर टाकले तर उर्वरीत मांस व अवयव नदीपात्रात साफ केले. यानंतर परवाना नसताना या मांसाची रीक्षातून (क्रमांक एमएच.19-एम-7651) वाहतूक केल्याची तक्रार फिर्याद पीयूष संतोष भोईटे यांनी दिल्यानंतर आरेापींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.


कॉपी करू नका.