पोलिस असल्याची बतावणी करीत पिस्टलाच्या धाकावर ट्रक चालकाला लुटले
पारोळा पोलिसात दुकलीविरोधात गुन्हा : एकाला अटक
A truck driver was robbed at gunpoint by pretending to be the policeपारोळा : ट्रक समोर दुचाकी आडवी लावून पोलिस असल्याचे सांगत चाकूसह पिस्टलाचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एकाला अटक करण्यात आली आहे
दोघांविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा
देवाशीष श्यामपद दत्ता (44, रा. कालघाट, पश्चिम बंगाल) हे ट्रक (डब्ल्यूबी 25 एल 2999) यामधून लोखंडीचे बार घेऊन ओरीसाकडून गुजरातमध्ये जाण्यासाठी पारोळामार्गे निघाले असताना पारोळा गावाजवळील हॉटेल सहयोगच्या पुढे दोघांनी ट्रकसमोर दुचाकी आडवी केली. आपण पोलीस असल्याची बतावणी करीत ट्रकचालक देवाशिष दत्ता यांना ट्रकखाली उतरवले. ट्रकचालकाला दोघांनी पिस्तुलासारख्या टोकदार वस्तूचा व चाकूचा दाखवून त्यांच्या जवळील दोन मोबाईल व रोकड असा एकूण 10 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटत पळ काढला. ही घटना 30 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी शाहरुख अब्बास खाटीक (26, रा.चाळीसगाव) आणि सरफराज अमीन अन्सारी (रा धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांपैकी शाहरुख खाटीक याला पारोळा पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

