एकहाती सत्ता दिल्याने आता गावातील समस्या सुटणार : एकनाथराव खडसे
Giving single-handed power will solve the problems in the village Now : Eknathrao Khadse कुर्हा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी माझ्यावर टीका केली, अगदी नाथाभाऊ संपला, असे देखील सांगण्यात आले मात्र मतदारांनी कुर्हा ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता देत 17 पैकी 13 जागा निवडून देत आपल्यावरील विश्वास दृढ केल्याने आता विकासकामे करण्यासाठी बांधील असल्याचे मत आमदार एकनाथराव खडसे यांनी येथील आभार सभेत व्यक्त केले. कुर्हा ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राम विकास पॅनलच्या सतरा पैकी 13 जागांवर सत्ता आल्याने आभार सभेचे आयोजन करण्यात आले.
नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
लोकनियुक्त सरपंचासह सर्व सदस्यांचा सत्कार एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. कुर्हावासीयांनी डॉ.बी.सी.महाजन यांना निवडून दिल्याने आता गावाचा निश्चित विकास होईल समस्या सुटतील, असा आशावादही खडसे यांनी व्यक्त केला.


यांची आभार सभेला उपस्थिती
काँग्रेसचे महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, काँग्रेस तालुकाधक्ष दिनेश पाटील, ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, विलास धायडे, पवनराजे पाटील, विशाल रोठे, माणिक पाटील, कुर्हा सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन, सोनू ठेकेदार, मनोहर पाटील, हरी पाटील, अरुण काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडे, गजानन कवडे, प्रभूसिंग बडूगे, कादीर शाह, गजानन पाटील, विनोद सोनवणे, जलील मास्टर, ग्रामपंचायत सदस्य रंजना माहुरकर, ज्योती काकडे, माजी सरपंच सुनीता मानकर, वढोदा उपसरपंच रंजना कोथळकर, मयूर साठे, सुशील भुते, युवराज माहुरकर, आशिष हिरोळे यांच्यासह सर्व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन मयूर साठे यांनी केले.