सारोळ्यातील दुचाकीस्वाराचा खेडगावजवळ अपघाती मृत्यू


Accidental Death of a bike Rider from Sarola Near Khedgaon पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सारोळा गावातील दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने उडवल्याने मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावानजीक घडला. या अपघात पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
विलास गवरचंद वाघ (32, सारोळा खुर्द, ता.पाचोरा) हे शुक्रवार, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. 19 ए.आर. 6403) ने जळगावकडून पाचोर्‍याकडे येत असतांना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत विलास वाघ हे गंभीर जखमी झालल्याने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विलास वाघ यांच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !