मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या पित्यावर अपघातरुपी क्रुर काळाचा घाला

चारठाण्यात शोककळा : अपघातात मोठी मुलगी गंभीर जखमी : एमआयडीसी पोलिसात अपघाताची नोंद


The father, who was on his way to meet his daughter, was accidentally killed जळगाव : मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना रामदेव वाडी गावाजवळ शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या घटनेत राजू दीपक कोळी (45, चारठाणा, ता.मुक्ताईनगर) असे मृताचे नाव आहे.

नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत राजू कोळी हे शनिवारी दुपारी निघाल्यानंतर भरधाव ट्रकने रामदेववाडी गावाजवळ धडक दिल्याने कोळी यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलवल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



डोक्यावरून चाक गेल्याने मृत्यू
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे शनिवार, 31 डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावहून निघाले. दुपारी साडे बारावाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. नंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवला. जखमीस तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !