अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवले


A minor girl from Amalner taluka was seduced and abducted अमळनेर : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्याील जवखेडा येथे घडली असून या प्रकरणी शनिवार, 31 डिसेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील तालुक्यातील जवखेडा येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 21 डिसेंबर रोजी रात्री मुलगी घरात झोपलेली असतांना गावातील सुरेश दयाराम मालचे याने फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. अल्पवयीन मुलीचा सर्व शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवार, 31 डिसेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात सुरेश दयाराम मालचे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जनार्दन पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !