रामेश्वर खुर्दच्या दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण

अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल


Rameshwar Khurd’s wife and child were brutally beaten अमळनेर : कारण नसताना दाम्पत्यासह मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केली मारहाण
अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील रहिवासी प्रभाकर धुडकू पाटील (24) हे अपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. शनिवार, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना गावातील मच्छिंद्र चंद्रसिंग जाधव, राजेंद्र चंद्रसिंग जाधव, अविनाश प्रताप जाधव, नितीन छोटू जाधव, मनोज संजय जाधव, प्रेम अविनाश जाधव आणि अमोल छोटू जाधव (सर्व रा. रामेश्वर खुर्द, ता.अमळनेर) यांनी दारूच्या नशेत येवून प्रभाकर पाटील यांनी शिवीगाळ केली तर त्यांची पत्नी लताबाई पाटील आणि मुलगा संदीप यांना बेदम मारहाण केली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. तिघांना जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक लक्ष्मीकांत शिंपी हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !