चाळीसगावात भीषण अपघात : भरधाव आयशरने उडवल्याने बिलाखेडचा तरुण ठार


Horrific accident in Chalisgaon : A young man from Bilakhed was killed when a high-speed Eicher blew up चाळीसगाव : तालुक्यातील बिलाखेड येथील तरुणाचा भरधाव आयशरच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी शहरातील मोठ्या पुलावर घडला. विश्वनाथ विजय वाघ (32, बिलाखेड, ता.चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

जागीच झाला तरुणाचा मृत्यू
विश्वनाथ वाघ हा तरुण आपल्या स्कुटीने जात असताना अचानक आयशरने (क्र. एम.एच.18 बीजी 1792) जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात विश्वनाथ विजय वाघ या तरूण चाकाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू ओढवला. अपघाताची माहिती कळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रविवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आयशरवरील चालक पसार झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !