जळगावातील जिजाऊ नगरात प्रौढाची आत्महत्या
Suicide of an adult in Jijau town of Jalgaon जळगाव : शहरातील वाघ नगर परीसरातील जिजाऊ नगरातील रहिवासी राजेश बन्सीलाल फुलपगारे (43) यांनी रविवार, 1 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता आत्महत्या केली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नैराश्येत आत्महत्या केल्याचा संशय
राजेश बन्सीलाल फुलपगारे हे वाघ नगरातील जिजाऊ नगरात एकटेच वास्तव्याला होते. शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या मुकबधीर विद्यालयात शिक्षक होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पत्नी मालेगाव येथे विभक्त राहत होत्या. घरी ते एकटेच राहत असल्याने नैराश्येत होते. त्यांच्या शेजारी राहणार्यांना घर बंद असल्याची शंका निर्माण झाली. राजेश फुलपगारे हे घरातून बाहेर येत नाही त्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना राजेश यांनी आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नजन पाटील, पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

