जळगावातील तांबापुरा भागात 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या


Suicide of a 19-year-old youth in Tambapura area of Jalgaon जळगाव : जळगावच्या तांबापुर्‍यातील 19 वर्षीय तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोहर कैलास गायकवाड (19, रा. तांबापुरा, जळगाव) असे मृताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मनोहर गायकवाड हा आई-वडील आणि लहान भावासोबत तांबापूरा परीसरात वास्तव्याला होता व हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवार, 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता जेवण करून घराच्या मागच्या खोलीत जेवन करून झोपला. दरम्यान, मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवार, 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आई राधाबाई या उठल्यानंतर प्रकार उघडकीला आला. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !