यावल पोलिसांकडून दोन दिवसात ड्रंक ऍड ड्राईव्हसह 25 वाहनांवर कारवाई
14 दुचाकी घेतल्या ताब्यात : नियमांचे उल्लंघण करणार्यांमध्ये खळबळ
Yaval police action against 25 vehicles with drunken driving in two days यावल : शहरात पोलिसांनी दोन दिवसात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह सह नियमांचे पालन न करणार्या 25 वाहनांवर कारवाई केली तर 14 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहे. यावल पोलिसांकडून रस्ते वाहतुक संर्दभात विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
कारवाईने उडाली खळबळ
यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन दिवसांपासुन शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. या दोन दिवसात दारूच्या नशेत दुचाकी चालवणे तसेच वाहतुक नियमाचे पालन न करणे अशा तब्बल 25 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. यात चार हजार 200 रूपये दंड देखील करण्यात आला तर 14 दुचाकी धारकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा नोंदवण्यात आला असून या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अपघात रोखण्याकरीता यावल पोलिसांकडून रस्ते वाहतुक संर्दभात विशेष मोहिम सुरू करण्यात आली. दररोज पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, विजय पासपोळ, हवालदार संजय देवरे सह आदींच्या पथकाकडून रात्री नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे.

