यावल पोलिसांची सात ठिकाणी सट्ट्यासह जुगारावर कारवाई


Yawal Police Action On Betting And Gambling St Seven Places यावल : यावल पोलिसांच्या पथकाने शहर व तालुक्यात सात ठिकाणी कारवाई करीत सट्टा जुगार खेळणार्‍या सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून तीन हजार 70 रुपयंच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे सट्टा जुगार चालवणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जुगार्‍यांच्या गोटात उडाली खळबळ
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांच्या पथकाने मालोद येथे छापा टाकला तेथे मुशीर बशीर तडवी हा सट्टा जुगार चालवतांना आढळून आला त्याच्याकडून 520 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. किनगाव येथे राहुल वसंत साळुंखे त्याच्याकडून 480 रुपयाची रोकड जप्त करण्यात आली. यावल शहरात जफर शहा रहमान शहा यांच्याकडे कारवाई करीत 360 रुपये हस्तगत करण्यात आले. साकळी येथे समाधान प्रकाश नन्नवरे यांच्याकडे छापा टाकत 410 रुपयांची रोकड तसेच यावल शहरात शिवानंद दिलीप तायडे यांच्याकडे 380 रुपयाची रोकड तर किनगाव येथे सत्तार कालेखा तडवी याच्याकडे छापा टाकून 480 रुपयाची रोकड हस्तगत करण्यात आली सर्व ठिकाणी सट्टा जुगार खेळवला जात होता तेव्हा यावल पोलिसांनी या सात ठिकाणी कारवाई करीत सात जणांना ताब्यात घेतले. एबूण तीन हजार 70 रुपयांची रोकड सह सट्टा जुगाराची साधने हस्तगत करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, सहायक फौजदार विजय पाचपोळ, युनूस तडवी, अनिल साळुंखे, गणी मिर्झा, भूषण चव्हाण, अलाउद्दीन तडवी, जाकीर तडवी या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध सट्टा जुगार चालवणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !