शिरसाड येथे अवैध गावठी दारू विक्री : एकाविरोधात गुन्हा


Illegal village liquor sale in Shirsad : Crime against one यावल : तालुक्यातील शिरसाड येथे अवैधरीत्या गावठी दारू विकणार्‍या एकावर पोलिसांनी कारवाई करीत दहा लिटर गावठी दारू हस्तगत केली. या कारवाईमुळे अवैध गावठी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरसाड येथे भोनक नदीच्या आडोशाला एक जण अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे पोलिसांना कळताच पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून संदीप राजेंद्र भालेराव (शिरसाड) यास ताब्यात घेतले. संशयीत एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये दहा लिटर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आढळून आला. गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त करीत त्याच्याविरुद्ध हवालदार अलाउद्दीन तडवी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !