गावठी पिस्टलासह काडतूस बाळगणारा संशयीत जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चोपडा शहरात जळगाव गुन्हे शाखेची कारवाई


Suspect carrying Gavathi pistol with cartridge in Jalgaon crime branch’s net जळगाव : गावठी पिस्टल व काडतूस बाळळगणार्‍या संशयीताच्या जळगाव गुन्हे शाखेने चोपडा शहरातून मुसक्या बांधल्या आहेत. अजित गुजर बारेला (37, रंगराव आबा नगर, मल्हारपुरा, चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या अंग झडतीतून 30 हजारांचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीला अधिक कारवाईसाठी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे संदीप पाटील, गोरख बागुल, प्रवीवण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाई करीत चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परीसरातून अजित बारेला यास अटक करीत अधिक कारवाईसाठी चोपडा शहर पोलिसांकडे सोपवले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !