रावेरातील कोट्यवधींचे वैयक्तिक शौचालय भ्रष्टाचार प्रकरण : संशयीतांनी जमा केले 50 लाख
रावेर : राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीतीलमधील बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी 22 आरोपीं कडून सुमारे पन्नास लाख रुपये कारवाईपोटी जमा केल्याची माहिती तपास अधिकारी सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिली.
आकडा वाढत जाण्याची शक्यता
रावेर पंचायत समिती मधील बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरण महाराष्ट्राभर गाजत आहे. आतापर्यंत रावेर पोलिसांनी सुमारे 22 आरोपीं कडून पन्नास लाख रुपये जमा केले असुन पुढील काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकार्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी वकीलासह पोलिस स्टेशनला या शौचालयाच्या गुन्हा संदर्भात भेट दिली होती.

