राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चाळीसगावातील दिनेश चव्हाण प्रथम

चाळीसगावातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे केले होते जलरंगातून चित्रण


चाळीसगाव : मुंबई येथील क्षत्रिय मराठा फाउंडेशन यांच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा विषय होता, आवडते ऐतिहासिक व्यक्तिमत्व. या विषयानुसार चाळीसगाव मधील सौंदर्यात भर घालणाऱ्या सिग्नल पॉइंटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे जलरंगातून चित्रण केलेले पोट्रेट चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी सदरील चित्रकला स्पर्धेत प्रदर्शित केले होते. त्यावरून आयोजक व स्पर्धा प्रमुख यांनी नुकताच निकाल जाहीर केला. यात दिनेश चव्हाण यांच्या छत्रपती या पेंटिंगला प्रथम क्रमांक जाहीर झाला. त्यांना मानपत्र स्मृतिचिन्ह रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विजय मोहिते, प्रदेशाध्यक्ष निखिल देशमुख, सोशल मीडिया अध्यक्ष श्रीकांत कोनेले यांनी कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !