जामनेरच्या विवाहितेचा तीन लाखासाठी विवाहितेचा छळ : पतीसह चौघांवर गुन्हा
Harassment of Jamner’s wife for three lakhs : Crime against four including husband जामनेर : तीन लाख रुपये न आणल्याने जामनेरच्या विवाहितेचा छळ करण्यात आला तसेच शिविगाळ व मारहाण करत घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी रविवारी सायंकाळी सात वाजता जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह चौघांविरोधात गुन्हा
जामनेर शहरातील राहणार्या पूजा समाधान पाटील (20) या आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सन 2021 मध्ये त्यांचा विवाह समधान सुदाम पाटील (वाकीरोड, जामनेर) याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती समाधान पाटील यांनी विवाहितेला माहेरहून 3 लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सासरे, सासु, जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर विवाहितेला घराबाहेर काढून हाकलून दिले. दरम्यान, विवाहितेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती समाधान सुदाम पाटील, सासरे सुदाम रमेश पाटील, सासू अशा सुदाम पाटील आणि जेठ गजानन सुदाम पाटील (सर्व रा. वाकी रोड, जामनेर) यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रीयाज शेख करीत आहे.

