कजगाव रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखीचा मृत्यू


An unidentified person died after being hit by a moving train near Kajgaon railway station पाचोरा : कजगाव रेल्वेस्थानकानजीक धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 2 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू
कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 346 / 11 / 13 दरम्यान डाऊन लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रास मिळाल्यानंतर पोलिस हवालदार मधुसूदन भावसार व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून मधुसूदन भावसार यांनी घटनास्थळा सविस्तर पंचनामा केला असता मयताचे अंदाजे वय 40 वर्ष असून मयताजवळ कोणताही ओळखीचा पुरावा मिळुन आलेला नाही.



मयताची ओळख पटवण्याचे आवाहन
मयताचा रंग सावळा, उंची 5 फुट 2 इंच डोक्याचे केस बारीक, अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मिळुन आली आहे. घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मधुसूदन भावसार हे करीत आहे. मयता विषयी कोणासही काही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात संपर्क साधावा असे आवाहन तपासी पोलिस हवालदार मधुसूदन भावसार यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !