यावल-सातोद रस्त्यावर दोन दुचाकींची धडकल्या : चौघे जखमी


Two bikes collided on Yawal-Satod road: four injured यावल : शहरातून सातोदकडे मार्गस्थ होणार्‍या रस्त्यावर शहराच्या बाहेर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यात चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले असून यात एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. अपघात कसा झाला समजू शकले नाही.

भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या
यावल सातोद रस्त्यावर महसूलच्या पुरवठा गोदामापुढे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये पारस धांडे (17, रा.सातोद) मेहुल पाटील (17, सातोद), समाधान बापू कोळी (33, रा.कोळवद), बळीराम श्रावण कोळी (80, कोळवद) हे चार जण जखमी झाले. अपघातानंतर तातडीने चौघा जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. रुग्णालयात डॉ. सचिन देशमुख, अधिपरिचारीका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी जखमींवर उपचार केले. या जखमींमध्ये बळीराम कोळी या वृध्दांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर यावल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !