वर्दळीच्या चौकातील दुकान फोडत 73 हजारांचा मुद्देमाल लांबवला


जळगाव : जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातून 72 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत सोमवारी 2 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद दुकान चोरट्यांना पर्वणी
हेमंत नंदलाल रंगलानी (50, साने गुरुजी कॉलनीच्या मागे, टेलीफोन नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रविवारी दुकान बंद होते. सोमवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या दुकानावर काम करणारा कामगार सुरेश फेगळे यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. चोरी झाल्याची माहिती पडल्यानंतर हेमंत रंगलानी यांनी दुकानावर धाव घेऊन पाहणी केली. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. हेमंत रंगलाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती शटरचे कुलूप तोडून दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर सामान असा एकूण 72 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी हेमंत रंगलानी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !