जळगावात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी गिरणा नदीपात्रात उतरतात तेव्हा…!


When the Collector descends into Girna riverbed to stop illegal sand transport in Jalgaon…! जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात वाळू वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात सोमवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक पाहणी केल्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. यावेळी एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.

सोमवरी सकाळीच केली पाहणी
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता थेट गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी रस्त्यावर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी आल्याचे पाहून काही वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक पसार झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आव्हाणे भागात सुरू असलेल्या बायपासच्या रस्त्याकडून थेट गिरणा नदीत उतरले.



आधी मिळते वाळू माफियांना दौर्‍याची माहिती
जिल्हाधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात देखील रात्रभर गिरणा नदीपात्रात तपासणी केली होती. मात्र, त्यावेळेस जिल्हाधिकार्‍यांच्या तपासणी दौर्‍याची माहिती वाळू माफियांना आधीच मिळाल्यामुळे वाळू माफिया पसार झाले होते. सोमवार, 2 जानेवारी रोजी सकाळी देखील जिल्हाधिकारी गिरणा नदीपात्राकडे गेले असता, धरणगाव तालुक्याच्या हद्दीतून अनेक वाहने पसार झाली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !