भुसावळातील दा.दे.ना.भोळे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजन एकक व विद्यार्थी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 3 जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर. पी.फालक यांनी हार अर्पण केला.
सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा घ्यावा आदर्श
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मार्गदर्शनात सांगितले की, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी योगदान दिले आणि समाजाचा प्रचंड विरोध स्वीकारून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एक प्रकारे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचेयोगदान खरोखरच खूप उल्लेखनीय आहे, सावित्रीबाई या समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होत्या, विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाचे कार्य त्यांनी केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण व महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.बी.ए.बेंडाळे, प्रा.के.व्ही.धांडे , प्रा.संजय पाटील व राष्ट्रीय एककचे विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.