फोटो व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीकडून मागितले सोने-चांदीचे दागिणे


Gold and silver jewelery demanded from a minor girl threatening to make the photo viral जामनेर : मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करून गावात बदनामी न होण्यासाठी आईचे सोने-चांदीचे दागिण्यांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली आहे. नितेश शंकर राठोड असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

संशयीत आरोपीला अटक
या संदर्भात 17 वर्षीय पीडीत तरुणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 15 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नितेश राठोड याने पिडीत अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत तीला त्याच्या राहते घरी बोलावले होते. यावेळी निलेशने एकांताचा फायदा घेत पीडीतेसोबत तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच तू जर तुझ्या आईचे सोने चांदीचे दागिने आणले नाहीत, तर मी गावात तुझी बदनामी करेल. एवढेच नव्हे तर माझ्या मोबाइलमध्ये असलेले फोटो सुध्दा व्हायरल करेल. तसेच तुझ्या भावास जिवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी सोमवार, 2 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश राठोड याला अटक करण्यात आली.. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !