वरणगावातील विवाहितेची शिवपुराण कथेदरम्यान भामट्याने चैन लांबवली


During the Shivpuran story of a married woman in warangaon, Bhamtya extended the chain वरणगाव : शिवपुराण कथा ऐकण्यासाठी शहरातील विवाहितेची 20 ग्रॅम वजनाची व 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन भामट्याने लांबवली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कथेदरम्यान चोरट्याने साधली संधी
वरणगावातील अयोध्या नगरातील रहिवासी सीमा सुनील माळी (46) या 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.30 दरम्यान भारत गॅस समोरील मोकळ्या मैदानात शिवपुराण कथा ऐकण्यासाठी गेल्या असता चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीची चैन लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात घेत तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !