जळगावातील खून प्रकरणी पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


In Jalgaon murder case, Pasar accused in Jalgaon crime branch जळगाव : जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील खून प्रकरणी पसार आलेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपाळपूरा भागातून अटक केली. विजयसिंग फुलसिंग पारधी (44, रा.जैनाबाद, जळगाव) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीत खून करून पसार असलेला आरोपी हा शहरातील गोपाळपूरा भागाकडून जैनाबाद परिसरात येत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, प्रितम पाटील सचिन महाजन, ईश्वर पाटील यांनी मंगळवार, 3 जानेवारी रोजी दुपारी सापळा रचून संशयित आरोपी विजयसिंग फुलसिंग पारधी याला ताब्यात घेतले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याने पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !