रामदेववाडीनजीक दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू : ट्रक चालकावर गुन्हा दाखल


Accidental death of bike rider near Ramdevwadi : Case registered against truck driver जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील दुचाकीस्वाराचाजळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ अपघाती मृत्यू झाला होता. . या अपघाताप्रकरणी सोमवारी 2 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात राजू दीपक कोळी (45, चारठाणा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू ओढवला होता.

मुलीला भेटण्यासाठी जाताना गाठले मृत्यूने
मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे मोठी मुलगी सोनाली राजू वनखेडे (30, चारठाणा) हे शनिवार, 31 डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावहून निघाले. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच ठार झाले होते. तर सोबत असलेली मोठी मुलगी सोनाली ही गंभीर जखमी झाली. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी सोमवार, 2 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता सोनाली वनखेडे यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहा.निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !