भुसावळात शहर पत्रकार संस्थेतर्फे निबंध स्पर्धा
पत्रपंडित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन
भुसावळ : भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रपंडित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरीक व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘बदलत्या काळातील पत्रकारांची भूमिका’, पत्रकारीतेतील नवे आयाम, ‘प्रिंट मिडिया, ईलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांची विश्वासार्हता’, ‘मला आवडलेली बातमी’ असे विषय आहेत.
या क्रमांकावर पाठवावा निबंध
वरील पैकी एका विषयावर कमीत-कमी 200 व जास्तीत जास्त 500 शब्दात निबंध मोबाईलवर टाईप करून अथवा कागदावर लिहून त्याचा फोटो काढुन 5 जानेवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अॅड. नितीन खरे यांच्या मोबाईल क्रमांक 9823223939 व श्रीकांत जोशी यांच्या मोबाईल क्रमांक 9881136143 वर पाठवावा. विजेत्यांना समारंभपूर्वक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल, असे भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, प्रकल्प प्रमुख उज्वला बागुल यांनी कळविले आहे.


