मध्य रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंत्याकडे आढळले 1.62 कोटींचे घबाड


नागपूर : नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अवध बिहारी चतुर्वेदी असे संबंधित अभियंत्याचे नाव असून 2016 ते 2022 या कालावधीत 1.62 कोटींची अघोषित संपत्ती जमविल्याचा आरोप आहे.

भुसावळसह नागपूरात बजावले कार्य
अवध बिहारी चतुर्वेदीला 1994 मध्ये मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यावर पहिली पोस्टिंग जळगाव येथील वरणगाव येथे देण्यात आली होती. त्यानंतर पदोन्नती झाल्यावर भुसावळ व नागपूर येथे सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) या पदावर कार्य केले. 2016 ते मार्च 2022 या कालावधीत चतुर्वेदीने उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता व वस्तू खरेदी केल्या. उत्पन्न व खरेदीचे गुणोत्तराचे गणित बसत नव्हते व सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत ही संपत्ती भ्रष्टाचारातून प्राप्त केल्याची बाब समोर आली. चतुर्वेदीने या कालावधीत एक कोटी 62 लाख 86 हजार 875 रुपयांची अघोषित मालमत्ता जमविली. या कालावधीत चतुर्वेदीचे उत्पन्न 74 लाख 19 हजार इतके होते. उत्पन्नापेक्षा ही मालपत्ता 219 टक्क्यांनी अधिक होती. सीबीआयने चौकशीनंतर चतुर्वेदीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.



इंदोरमध्ये घर, लॉकरमध्ये 50 लाखांचे दागिने
चतुर्वेदीकडे 2015 च्या अगोदर 86 लाख 89 हजारांची संपत्ती होती. तर 2016 ते 2022 या कालावधीत हा आकडा 2 कोटी 72 लाखांवर पोहोचला. अवैधरित्या कमविलेल्या पैशांतून इंदोर येथील महालक्ष्मी नगर येथे एक घरदेखील खरेदी केले. 2015 च्या अगोदर चतुर्वेदीकडे इंदोरमध्येच एक घर व एक फ्लॅट होते. इंदोर येथील बँक लॉकरमध्ये 50 लाखांचे दागिने आढळले. तर घरी 60 लाखांची रोकड आढळली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !