बोदवडमध्ये व्यावसायीकाकडेच मागितली खंडणी : एकाविरोधात गुन्हा


बोदवड : दुकान सुरू ठेवण्यासाठी दरमहा एक हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
बोदवड शहरातील जामनेर रोडवर शांताराम सुरेश शेळके (40) यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. मंगळवार, 3 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास संशयीत वसंता अशोक सोनवणे (रा. भिलवाडा, बोदवड) याने शांताराम शेळके यांना अश्लिल शिवीगाळ करत तुला जास्त माज आलाय का?, तुला तुझं दुकान सुरू ठेवण्यासाठी मला दर हप्त्याला एक हजार रुपयाचा हप्ता द्यावा लागेल. तसेच या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. याआधी देखील वसंता सोनवणे याने शांताराम शेळके यांच्याकडून दुकान सुरू ठेवण्यासाठी खंडणी घेतली असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय सुधाकर शेजोळे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !