जळगाव घरफोडीचे सत्र कायम : चार लाखांच्या ऐवजावर डल्ला


Jalgaon burglary session continues : Dalla on compensation of four lakhs जळगाव :  शहरात सातत्याने चोर्‍या-घरफोड्या सुरूच आहेत. अयोध्या नगर भागातील उषा ई. रेसिडेन्सीमधील फ्लॅटमधून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह एक लाखांची रोकड असा एकूण 3 लाख 97 हजार 117 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
सनी विकास सोनार (32) यांनी फिर्याद दिल्यानुसार 2 जानेवारीच्या सायंकाळी 5 : 45 ते 7 : 45 च्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकर तोडून त्यातील एक लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण एकूण तीन लाख 97 हजार 117 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !