कासली गावात बंद घरातून 40 हजाराची रोकड चोरीला


40 thousand cash was stolen from a closed house in Kasli village पहूर : जामनेर तालुक्यातील कासली गावातील महिलेचे बंद घरातून चोरट्यांनी 40 हजारांची रोकड लांबवली. याबाबत मंगळवारी 3 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पहूर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील कासली येथे अनिताबाई संजय महाले या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 2 जानेवारी रोजी रात्री 10 ते 3 जानेवारी सकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान महिला घरात झोपली असताना युवराज शंकर पांढरे (55, रा.शेरी, ता.जामनेर) याने महिलेच्या घरात घुसून स्टीलच्या डब्यात ठेवलेले 40 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे दीर अनिल गजमल महाले यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी युवराज शंकर पांढरे (शेरी, ता.जामनेर) याच्या विरोधात मंगळवार, 3 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास हवालदार प्रवीण चौधरी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !