भुसावळात अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ : राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन, भुसावळतर्फे मंगळवार, 3 जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन स्वरूपात दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात आले. उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, अॅड.सुनील पगारे, डी..एस.हायस्कुलचे मुख्याध्यापक मोहनदास सपकाळे, भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, अॅड.प्रिया अडकमोल यांची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
उपक्रमासाठी अनेक दात्यांनी मदत केली व संकलन झालेले साहित्य होतकरू गरजवंत विद्यार्थीनींना फाउंडेशन संचालित अवनी दत्तक योजना या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत विद्यार्थिनींना वितरण करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी सांगितले. फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सुजाता सपकाळे, आशा पठारे, दुर्गा सोनवणे, लॉ विद्यार्थी प्रतिमा अग्रवाल यांनी परीश्रम घेतले.