भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात


भुसावळ : भुसावळ नगरपरीषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वरीष्ठ शिक्षिका प्रगती मेने यांच्याहस्ते यांच्याहस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी , सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
स्वाती सोनवणे, गायत्री मतलाने, संध्या डावरे, प्रथमेश मोरे, विनायक सभादिंडे या विद्यार्थ्यांनी भाषण केले. शिक्षकांमधून सरला सावकारे, संध्या धांडे, डॉ.प्रदीप साखरे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयीची माहिती दिली. आभार नाना पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !