अवैध धंद्यांची तक्रार केल्याचा राग : कजगावातील चौघांची तरुणाला अमानुष मारहाण


Anger for reporting illegal activities : Youth Brutally Beaten by four in Kajgaon भडगाव : कजगावातील चौघांनी अवैध धंद्यांची तक्रार केल्याच्या रागातून एकाला अमानुष मारहाण करीत शिविगाळ केली. या प्रकरणी अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये चौघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार केल्याचा राग
26 वर्षीय तरुणाने कजगावातील अवैध धंद्यांबाबत तक्रारी अर्ज दिल्याच्या रागातून पीनू महाजन, राजू चव्हाण, विजू चव्हाण, धर्मा माळी (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.कजगाव, ता.भडगाव) या सर्वांनी मिळून बुधवार, 4 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास कजगाव बस स्थानकाजवळील धनश्री कॉम्प्लेक्स मधील एका झेरॉक्स दुकानाजवळ पीडीत तरुणाला अवैध धंद्या बाबत तक्रारी अर्ज दिल्याचा राग मनात धरुन चापटा-बुक्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन पाहुण घेऊ, अशी धमकी दिली. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !