तिकीट काढण्याचे सांगताच महिला कंडक्टरसह बस चालकाला मारहाण : पिंप्रीच्या तरुणाविरोधात गुन्हा


Woman conductor and bus driver assaulted when told to take ticket : Crime against youth of Pimpri चोपडा : पिंप्रीच्या तरुणाविरोधात महिला कंडक्टरसह चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपीला मोबाईलमधील गाण्यांचा आवाज हळू कर तसेच व्यवस्थीत टिकीट घे बोलल्याचा राग आल्याने हा प्रकार घडला. या प्रकरणी रतीक जुलाल बागुल (23, रा.पिंप्री, ता.चोपडा) या तरुणाविरोधात अडावद पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.

गाणे बंद कर सांगितल्याचा राग
45 वर्षीय महिला कंडक्टरने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार, 4 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कमळगाव बस स्थानकावर बसमध्ये बसल्यावर रतीक बागुल हा तरुण महिला कंडक्टरकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी देखील तो महिला कंडक्टरकडे पाहत होता. त्यावर तू व्यवस्थीत टिकीट घे मला तुझ्यापेक्षा मोठी मुले आहेत, असे महिला महिला कंडक्टरने सुनावले. याचा राग आल्याने रतिकने महिला कंडक्टरला बसच्या खाली ढकलून चापटा-बुक्यांनी मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यास आलेले बस चालकयांना देखील रतिकने चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !