समाजाला जागृत करणे काळाची गरज : आमदार संजय सावकारे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भुसावळात व्याख्यान
It is the need of the hour to awaken the society : MLA Sanjay Savkareभुसावळ : समाजाला जागृत करणे ही काळाची गरज असून सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक होणारी वाढ पाहता अशा व्याख्यानाच्या माध्यमातून निश्चितपणे जनतेत सतर्कता निर्माण होईल, असा आशावाद भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआय भुसावळ ताप्तीतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ‘सायबर जागरूकता व सतर्कता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता गरजेची
प्रमुख वक्ते तुषार राजू परदेशी यांनी नागरीकांनी सायबर क्राईम पासून कसे सावध रहावे याबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करतांना, फेसबुक व्हॉटसअॅप, ट्विटर, स्नॅपचेट, इन्स्टाग्राम सारख्या डिजिटल मीडिया वापरताना व कुठलेही अनोळखी मेसेजवर रीप्लाय करतांना काय काळजी घ्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ईमेल आयडीचा दुरुपयोग कसा होतो,म हिलांनी ठेवल्या डीपीचा दुरुपयोग कश्या पध्द्धतीने केला जातो हे देखील त्यांनी सांगत महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआईच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेता सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या महान स्त्रियांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून स्त्रियांना व उपस्थित सर्व नागरीकांना इंटरनेटचा वापर करताना सतर्कता गरजेची असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन वैशाली सैतवाल तर आभार अनिता आंबेकर यांनी मानले. कार्यक्रममाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळ व जे.सी.आई.च्या सदस्यांनी परीश्रम घेतले.