चोरट्यांनी रुग्णालय महिला कर्मचार्याच्या मोबाईलची केली चोरी
Mobile phone of female employee removed from hospital : Jalgaon case जळगाव : शहरातील निलकमल रुग्णालयात खाजगी नोकरी करणार्या महिलेचा अज्ञातांनी मोबाईल लांबवला. या प्रकरणी बुधवार, 4 जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सुनीता सुरेश मोरे (60, कांचन नगर, जळगाव) या महिला पंचमुखी हनुमान चौकातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. 1 जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन महिन्याच्या दरम्यान ड्युटीवर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मालकीचा 3 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी मोबाईलचा सर्व शोध घेतला, परंतु मोबाईल कुठेही मिळून आला नाही. अखेर बुधवारी 4 जानेवारी रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंढे करीत आहे.


