स्फोटातील मलबा हटवताना आढळला आणखी एक मृतदेह
Blast at Jindal Company : Death toll reaches three नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवार, 1 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात दोन महिला मजुरांचा मृत्यू ओढवला होता तर 20 रुग्णांना नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्या आले आहे. दरम्यान, मलबा हटवण्याचे काम सुरू असताना सुधीर मिश्रा (प्रयाग राज, यूपी) या मजुराचा मृतदेह आढळला असल्याची मयताचे बंधू कमलाकर मिश्रा यांनी दिली. मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
चौघांची प्रकृती चिंताजनक
स्फोटानंतर जखमी झालेल्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे तर गेल्या तीन दिवसांपासून मलबा हटविण्याचे काम सुरू असताना बुधवार, 4 रोजी सकाळी 10 वाजता सुधीर मिश्रा या कामगाराचा मृत्यू आढळून आल्याने मलब्यात आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


