कुंभारखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधव चौधरी
Madhav Chaudhary, Upsarpanchpadi of Kumbharkheda Gram Panchayat रावेर : तालुक्यातील कुंभारखेडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत लोकनियुक्त सरपंचपदी भरत माधव बोंडे यांना कौल मिळाला होता तर बुधवार, रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये बारा ग्रामपंचायत सदस्यांपैकी पाच सदस्यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला तर माघारीनंतर एकमेव दोन अर्ज राहिले. त्यामुळे माधव चौधरी व दीपाली पाटील यांच्यामध्ये सरळ लढत झाली. यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले यामध्ये माधव चौधरी यांना 8 मते तर दीपाली पाटील यांना चार मते मिळाल्यानंतर उपसरपंचपदी माधव चौधरी यांची निवड घोषित करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे.खरे, सहा.अधिकारी वार .आय.तडवी यांच्यासह ग्रामसेवक रूपाली पाटील यांनी कामकाज पाहिले. ग्रामस्थांमधून शांताराम राणे, प्रल्हाद बोंडे, शरद चौधरी, विजय राणे, रवींद्र पाटील, भास्कर पाटील, हरीश कुमार चौधरी, अतुल राणे, प्रदीप पाटील, माधव बोंडे, राजेंद्र देशमुख, संदीप चौधरी, सूर्यकांत पाटील, पंकज चौधरी, राहुल पाटील, कपिल चौधरी, चंद्रसिंग चव्हाण, समाधान पाटील, राकेश चव्हाण हे उपस्थित होते. सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली महेरबान तडवी, देवेंद्र पाटील, पोलीस पाटील, प्रल्हाद पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
